संजय लांडगे,वाडा,
अखेर वाडा बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम सुरु,
वाडा एसटी आगार येथे काँक्रिटीकरण करण्यासाठी आजपासून खोदकाम सुरु केले असून हे काम महिनाभर चालेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.हे काम पूर्ण होईपर्यंत सर्व बसेस नवीन स्थानकातून सुटणार आहेत.त्यामुळे विद्यार्थी व सर्व प्रवाशांना बस पकडण्यासाठी कोर्टासमोरील बस स्थानकाकडे धाव घ्यावी लागत आहे.पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थी बस पकडण्यासाठी महामार्गांवरून चालत जाताना दिसत होते.
खंडेश्वरी नाका येथे एक उपपीक पॉईंट ठेवणार होते. मात्र पहिल्या दिवशी असे काही दिसून आले नाही.
खंडेश्वरी नाका येथे पीक-अप पॉईंट असेल तर दोन्ही बाजुला जाणाऱ्या प्रवाशांसाठी तात्पुरती शेड बांधणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहॆ.

