अनिल वैद्य,नाशिक,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथाचे दर्शन घेतले,
श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज पौषवारी तीन दिवसीय महोत्सवाचा ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय पूजेने शुभारंभ करण्यात आला.
यावेळी त्रंबकेश्वरमध्ये लाखो वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.भगव्या पताका घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निवृत्तीनाथ मंदिरात जाऊन घेतले.निवृत्तीनाथाचे दर्शन घेण्यासाठी निवृत्तीनाथ मंदिरात जाणारे पहिले गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचा इतिहासात नोंद झाली आहॆ.
” निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद,” या अभंगाची अनुभूती त्रंबकेश्वर येथे पौषवारी अर्थात निवृत्तीनाथ संजीवन समाधी सोहळा यात्रेनिमित्त आलेल्या लाखो वारकऱ्यांना झाली. पौषवद्य एकादशी अर्थात षटतीला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतलेल्या घटनेला ७२५ वर्षे पूर्ण झाली आहेत.यावर्षी वारीमध्ये निवृत्तीनाथ समाधी मंदिरामध्ये आज गिरीश महाजन यांनी संपत्ती निवृत्तीनाथ समाधी मंदिराची व निवृत्तीनाथ समाधी मंदिराची तसेच विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा केली.तत्पूर्वी मंदिराच्या विश्वस्तांच्या वतीने ही पूजा करण्यात आली.दरवर्षी या पौषवारीला लाखोंच्या संख्येने वारकरी दिंड्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्रंबकेश्वर येथे येत असतात. निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी दाखल होत असतात.यंदाही ६०० पेक्षाहुन अधिक दिंड्यातून लाखो वारकरी खांद्यावर भगवी पताका तुळशी वृंदावन हाती टाळ मृदंग आणि अभंग गात त्रंबकेश्वरी दाखल झाले आहेत. त्रंबकेश्वर मध्ये येणाऱ्या दिंड्यांचे नगरपालिका आणि राज्य प्रशासनातर्फे गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. शासकीय महापूजेनंतर गिरीश महाजन यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आ.हिरामण खोसकर नगरपालिका मुख्याधिकारी श्रीया देवचक्के,मंदिर संस्थांच्या अध्यक्ष कांचनताई जगताप,विश्वस्त प्राध्यापक अमर ठोंबरे माजी अध्यक्ष निलेश गाढवे,आदी मान्यवर उपस्थित होते.पौष वारी यात्रेनिमित्त ठिकठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी चहा पाणी व उपवासाचे पदार्थ इ.ची व्यवस्था करण्यात आली होती.त्याचबरोबर यात्रेमध्ये शेकडो विक्रेत्यांनी भोजन प्रसाद माळा मूर्ती धार्मिक ग्रंथ पेढे उपवासाचे पदार्थ खेळणी आदींची दुकाने थाटली आहेत. या निमित्ताने त्रंबकेश्वरच्या आसपासच्या खेड्यापाड्यातील लोकांना आदिवासींना चांगला रोजगार उपलब्ध झाला असून ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीला यात्रा उत्सवाच्या तीन दिवसाच्या काळात चांगली गती मिळाली.संतांच्या समाजसेवेचा संतांच्या नंतर शेकडो वर्ष समाजाला होत असलेला हा लाभ लक्षणीय आहे.दरम्यान केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी यात्रेच्या दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील बारा ज्योतिर्लिंग शिवमंदिर भेट देऊन दर्शन घेतले.त्यावेळी त्रंबक नगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर भगवी पताका घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या वारकऱ्यांची गर्दी पाहून त्यांनी कुतूहलाने चौकशी केली असता त्यांना निवृत्तीनाथाच्या वारी बाबत माहिती देण्यात आली.वास्तविक अमित शहा यांची वारी काळातच त्र्यंबकेश्वरी भेट होत असल्यामुळे निवृत्तीनाथ संस्थानतर्फे त्यांना निमंत्रण देण्यात आले होते.मात्र शहा यांच्या निवृत्तीनाथ मंदिर दौरा निश्चित नसतानाही त्रंबकेश्वर दर्शन नंतर हेलीपॅडकडे जाणाऱ्या शहा यानी आपला मोर्चा निवृत्तीनाथ समाधी मंदिराकडे वळवला,तेथे त्यांनी संपत्ती संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मंदिर विश्वस्तांच्या तर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सत्कार करण्यात आला.

