जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन,
जेएसडब्ल्यू फाऊंडेशनचे सहकार्य आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल,मिरा रोड येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
सदर शिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा परिषद पालघर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी,भक्ती वेदांत हॉस्पिटलचे डॉ.निखील राऊत,जेएसडब्ल्यू फाऊंडेशनचे आरोग्य व पोषण विभाग प्रमुख डॉ.आशिष जैन, असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. आलोक कुमार,तसेच जिंदाल स्टील कोटेड प्रॉडक्ट्स लिमिटेड तारापूरचे प्लांट हेड अजय खंडेलवाल यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
जेएसडब्ल्यू फाऊंडेशन गेल्या ९ वर्षांपासून जव्हार व पालघर परिसरात आरोग्य शिबिरे आयोजित करत आहे. यंदा २०२५ मध्ये २७ गावांतील २७ शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना जनरल आरोग्य तपासणी,दंत तपासणी,रक्त तपासणी आणि डोळे तपासणी,अशा सेवा देण्यात येणार आहेत.या शिबिराचा लाभ जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांना हो णार असून,आजपासून साखरशेत येथील जिल्हा परिषद शाळेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.आज १४६ मुले आणि ५५ मुलींनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी मॅजिक बस फाऊंडेशनचे सहकारी,भक्ती वेदांत हॉस्पिटलचे देवेंद्र पाटील आणि जेएसडब्ल्यू फाऊंडेशनचे संतोष महाजन हे विशेष प्रयत्न करत आहेत.

