संजय लांडगे,वाडा,
वाडा सहयोग नगर येथे सुसज्ज बागायतीचे भूमिपूजन संपन्न
शहापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार दौलत दरोडा यांच्या आमदार निधीतून ५३ लाख रु.चा निधी खर्च करून वाडा शहरातील सहयोग नगर येथे अतिशय सुसज्य व सुंदर असा बगीचा तयार करण्यात येणार आहे.
या बागायतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम काल मोठ्या थाटामाटात पार पडला.
रोहिणी शेलार सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पालघर,संदीप पवार उपाध्यक्ष भाजप पालघर जिल्हा व निशा सवरा अध्यक्षा आसमंत सेवा संस्था यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमी पूजन करण्यात आले.
याप्रसंगी सहयोग नगरच्या रहिवाश्यानी रस्ता व पाण्याचा प्रश्न उपस्थित केला असता संदीप पवार यांनी सांगितले की सध्या वाड्यात एकच टाकी असून लवकरच वाड्यातील विविध ठिकाणी पाण्याच्या पाच टाक्या उभारण्यात येणार आहे.त्यामुळे वाड्यातील प्रत्येक नगराचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार आहे.
उदघाटन प्रसंगी भाषण करतांना निशा सवरा म्हणाल्या,की या मैदानात मी लहानपणी खेळली आहे.याच मैदानात आता सुसज्ज बगिचा होणार आहे आणि त्याच्या भूमीपूजनाच्या उदघाटनप्रसंगी मला बोलावलं,ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब असल्याचे सांगून त्यांनी सर्व रहिवाशांचे आभार व्यक्त मानले.
याप्रसंगी रोहिणी शेलार,निशा सवरा,संदीप पवार,डॉ.सचिन पळसकर,जयेश शेलार,हर्षल खांबेकर,सीताराम पाटील.नाना साबळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पालवे यांनी केले.तर सुधीर खिलारे यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.
चौकट
शासकीय गार्डन किंवा रस्त्याचे कोणतेही काम असो,काम चालू असताना सुज्ञ नागरिकांनी स्वतः जागेवर उभे राहून ते कंत्राटदाराकडून योग्य पद्धतीने करून घेतले तर काम दर्जेदार होऊ शकते.या गार्डनचेही काम टिकाऊ, सुसज्ज व सुंदर बनवून घेण्याची जबाबदारी येथील नागरिकांची आहे.
रोहिणी शेलार
सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद,पालघर

