जव्हार प्रतिनिधी,
चांभारशेत येथे जाबर परिवार मेळावा उत्साहात साजरा,
- जव्हार तालुक्यातील चांभारशेत येथे जाबर कुल परिवार मेळावा ७ वा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासीची जुनी परंपरा सांबळ,तारपा व तूर नाच नृत्य सादर करून कुलदेवतांची मिरवणूक काढून पूजन करण्यात आले. महाराष्ट्र,गुजरात व दादरा नगर हवेली वरून आलेले जाबर कुल परिवरांचे सदस्यांचे अनेक ग्रुपने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कुलदेवतेचे पूजन का करावे,याचे महत्व सांगितले.तसेच तरुणांनी पुढाकार घेऊन आपली परंपरा चालू ठेवावी,असे आवाहन प्रमुख पाहुणे रमेश घुटे यांनी केले.हा मेळावा आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की,जाबर कुल परिवार हा कानाकोपऱ्यात राहत असेल तर तो एकत्र कसा येईल,आपली ओळख कशी होईल,आपले कुटुंबं एकत्र कसे राहील व यापुढे ही हा कार्यक्रम चालू राहील,असे प्रतिपादन परिवाराचे अध्यक्ष अर्जुन जाबर यांनी केले.या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र,गुजरात व दादरा नगर हवेली या ठिकाणावरून हजारो लोक सामिल झाले होते.या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून दिनेशभाई जाबर-शिवसेना शाखा प्रमुख मानपाडा ठाणे यांनी सांगितले की या आधी असा मेळावा मी कुठेच बघितलेला नव्हता,यापुढचा मेळावा मी ठाणे येथे आयोजित करणार आहे,असे सांगितले.त्याच प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जाबर कुल परिवार मेळावा गेल्या सात वर्षांपासून साजरा होत आहे.या कार्यक्रमाला जाबर कुल परिवाराचे अध्यक्ष अर्जुन जाबर,उपाध्यक्ष तुकाराम जाबर,सचिव उमेश जाबर,नियोजन प्रमुख प्रदिप जाबर,प्रमुख पाहुणे दिनेश जाबर शिवसेना शाखा प्रमुख ठाणे,रमेश मावंजी घुटे,अंकुश जाबर सरपंच पारगाव,योगिता जाबर सरपंच चांभारशेत,विष्णू दळवी वसई,प्रमोद जाबर-ठाणे यांची उपस्थिती लाभली होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन उमेश जाबर सर व भगवान जाबर यांनी केले.

