जव्हार प्रतिनिधी,
रायतळे धोपडपाडा येथे ” मिशन स्वदेश,” अंतर्गत ब्लँकेटवाटप,
जव्हार तालुक्यातील दुर्गम भागांतील रायतळे ग्रामपंचायत मधील धोपडपाडा येथे ” मिशन स्वदेश,” अंतर्गत ब्लँकेट वाटप मोहिमेचा यशस्वी समारोप करण्यात आला.या मोहिमेसाठी संपूर्ण कांदिवलीतील रॉबिन हूड आर्मी टीमचे अजय यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.या मोहिमेचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी यांच्या सहकार्याने धोपडपाडा येथील युवा कार्यकर्ते कृष्णा गोतरणे, संजय सांबरे आणि त्यांच्या टीमच्या पुढाकाराने करण्यात आले.समाजातील गरजू व्यक्तींना थंडीत उबदारपणा मिळावा या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाने स्थानिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.मोहिमेच्या यशस्वितेमागे अनेक स्वयंसेवकांचा निःस्वार्थी सहभाग,वेळ,प्रयत्न आणि संसाधनांची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.या सहकार्यामुळे गरीब गरजू कुटुंबांना उबदार ब्लँकेट्स मिळाले,ज्यामुळे थंडीत त्यांना दिलासा आणि आधार मिळाला आहे.सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन अशा प्रकारच्या उपक्रमांची सातत्याने गरज आहे.आपल्या सहकार्यामुळे प्रेम,दयाळूपणा आणि कळकळ पसरवण्याचे हे मिशन पुढे नेण्यास प्रेरणा मिळाली आहे.
त्याच्या या निःस्वार्थ योगदानासाठी ग्रामस्थांनी रॉबिन हूड आर्मी टीमचे आभार व्यक्त केले.

