संदीप जाधव,बोईसर,
दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप,
बोईसरमधील नामवंत संस्कृती वर्ल्ड स्कूल,महाविद्यालयाच्या दोन दिवसीय भव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांची झलक आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा सुरेख संगम यावेळी पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध रंगीबेरंगी कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील पुरस्कार विजेते पटकथालेखक किरण कुलकर्णी,अक्षया शक्तीचे सीईओ आणि प्रसिद्ध समाजसेवक डॉ.नारायण अय्यर,तसेच तरुणाईमध्ये लोकप्रिय मराठी यूट्यूबर सिद्धांत जोशी (ओळख ‘श्रीमान लेजेंड,’), प्ले ब्लॅक सिंगर अभिजित गोसाळ आणि प्रसिद्ध संस्थेचे पदाधिकारी इ.कलावंत उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोकनृत्य,आधुनिक नृत्य,सामाजिक संदेश देणारे नाट्य,गाणे,वादन आणि सूत्रसंचालन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली बहुआयामी कला सादर केली.
कार्यक्रमात पालकांचा आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. प्रमुख पाहुणे मनोज अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठोर मेहनत,चिकाटी आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले.
अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेले मनोज अधिकारी यांनी आपल्या गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने नागझरी येथे विद्या संकुल संस्थेची स्थापना केली.अल्पावधीतच शाळा व महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता आणि सांस्कृतिक उपक्रमांमधून जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पुढील वर्षी आणखी भव्य स्वरूपात स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.या दोन दिवसीय स्नेहसंमेलनामुळे संस्कृती वर्ल्ड स्कूल संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना दिली आहे. अशा उपक्रमांमुळे शाळेचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक दर्जा अधिक उंचावेल,असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

