जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे नशामुक्त भारत अभियान,
जव्हार पंचायत समितीतर्फे आज पंचायत समिती जव्हार येथे नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सामूहिक नशामुक्त प्रतिज्ञेचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाद्वारे नशामुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करण्यात आला.
सदर कार्यक्रम पंचायत समिती उपसभापती दिलीप पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा,विस्तार अधिकारी मनोहर उमतोल,वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण पाटील, विस्तार अधिकारी शिक्षण पुंडलिक चौधरी,तसेच किरण शिंदे व इतर अधिकारी व विभाग प्रमुख,कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान नशामुक्त जीवनाची शपथ घेण्यात आली व समाजातील नागरिकांना नशेपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.तसेच सर्व शाळा,महाविद्यालयात सदर अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सांगितले. सदर उपक्रमाने समाजात व्यसनमुक्ती विषयावर जनजागृती वाढवण्याचा प्रयत्न केला असून, यासाठी पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

