संजय परब,वसई,
कनिष्ठ अभियंत्याला अखेर
कामावरून कमी करण्यात आले,
वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ” जी,” मध्ये कार्यरत असलेला कनिष्ठ अभियंता कौस्तुभ संजय तामोरे यांस डच्चू देण्यात आला आहे.बेजबाबदार व बेशिस्त वर्तणुकीमुळे ठेक्यातून त्याला कमी करण्यात यावे,असे आदेश अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी नुकतेच दिले.
कौस्तुभ संजय तामोरे हा कनिष्ठ अभियंता या पदावर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अतिक्रमण-अनधिकृत बांधकाम विभागात कार्यरत होता.मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी वसई-विरार महापालिकेला प्राप्त झालेल्या होत्या.
त्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्यामुळे त्याना ठेक्यातून तात्काळ कमी करण्याचे लेखी आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले.त्यानुसार अर्चना सर्व्हिसेस,या ठेकेदार कंपनीने कनिष्ठ अभियंता कौस्तुभ संजय तामोरे यांना ठेक्यातून कमी केल्याचे महापालिकेला कळवले आहे.

