नदीम शेख,पालघर
संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती सभा संपन्न
आज दि. ०८/०१/२०२५ रोजी जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आयोजित कण्यात आली होती.
सदर सभेमध्ये HMPV या आजाराविषयी उपाययोजना व राज्यस्तरीय मार्गदर्शक सुचना अंमलात आणण्यासाठी आढावा घेण्यात आला.
यावेळी डॉ.संतोष चौधरी सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.पालघर,डॉ.रामदास मराड जिल्हा शल्य चिकित्सक,शशिकांत साळुंके जिल्हा सर्वेक्षण अधिकारी,डॉ. संदिप निंबाळकर, सहा-संचालक कुष्ठरोग,डॉ. अजय ठाकरे साथरोग अधिकारी,डॉ.अश्विनी राव जिल्हा हिवताप अधिकारी इ. तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख / प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
सभेमध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आयसीएमआर व जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनेनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या बरोबरीने सर्व विभागांनी HMPV या आजाराविषयी जिल्ह्यामध्ये जनजागृती करुन नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

